
_खिडकी टीम
एका बेटावर माणसं आहेत, पण त्यांचं जग इतकं अबाधित आणि इतकं मौन आहे की आपण ते फक्त दूरवरूनच पाहू शकतो. बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या धनुष्याच्या टोकावर आपली प्रगती संपते. ते आहेत सेन्टिनलेस लोक — नॉर्थ सेन्टिनल बेटावर राहणारी पृथ्वीवरील सर्वात वेगळी, एकाकी आणि आदिम जमात.
इतिहासाच्या धुळीत गडप झालेली एक कहाणी: संशोधकांच्या मते, सेन्टिनलेस जमात ६०,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतर करून अंदमान बेटावर आली असावी.तेव्हापासून त्यांनी कोणतीही बाह्य संस्कृती, धर्म, सरकार, तंत्रज्ञान किंवा व्यापार स्वीकारलेला नाही.त्यांचं बेट म्हणजे त्यांचं विश्व , त्यात कोणीही परका नको.
पहिला संपर्क – १८६७ चं जहाज: १८६७ मध्ये निनेवेह नावाचं एक भारतीय जहाज या बेटाजवळ अपघातग्रस्त झालं. चौकशीसाठी गेलेल्या ब्रिटिश सैनिकांवर सेन्टिनलेस लोकांनी बाणांनी हल्ला केला.त्याचं नोंदलेलं हे संपूर्ण इतिहासातलं पहिलं संपर्क प्रकरण.त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली –”या जमातीला कोणीही नको आहे.”

त्यांची खाद्यसंस्कृती – निसर्ग हेच स्वयंपाकघर , सेन्टिनलेस लोक शिकार आणि संकलन यावर जगतात. डुक्कर, मासे, पक्षी, समुद्री कासव – हे शिकार करतात. फळं, मध, कोळशात भाजलेली कंदमुळे हे संकलित करतात.
संपर्काच्या इतर वेळा आणि ‘जॉन चाऊ’ प्रकरण: १९७०–१९९० दरम्यान भारत सरकारनं च्या काही वेळा बेटावर फळं, नारळ टाकून मैत्रीचे संकेत दिले. ती लोक कधी एकदा हसले, तर दुसऱ्याच वेळेस बाणांनी हल्ला. २०१८ मध्ये अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाऊ बेटावर गेला. पण त्याला त्या माणसांनी ठार मारून टाकले.
खिडकीतून पाहताना: सेन्टिनलेस लोक म्हणजे निसर्गाचं मूळ रूप. त्यांचं घर म्हणजे झाडं, त्यांचं अन्न म्हणजे समुद्र, आणि त्यांची भाषा म्हणजे मौन. आपण पृथ्वीपासून तुटत गेलो, आणि त्यांनी पृथ्वीला घट्ट धरून ठेवलं. आपण जंगल तोडलं, त्यांनी जंगलाला देव मानलं. आपण माणूसपण गमावल, ते अजूनही कदाचित जपून आहेत.
ते आपल्याशी बोलत नाहीत,
पण त्यांच्या अस्तित्वाने आपल्याला बोलकं केलं आहे हे मात्र नक्की..